Posts

रावण दहन योग्य की अयोग्य???

Image
                    एखाद्या कथेला कलाटनी देऊन त्याला वास्तविक व जीवंत वाटेल या पद्धतीने लिहिण्याचे काम लेखकाला चांगले जमते, प्रत्येक लेखक लेखणीतून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतो पण ते कितपत सत्य आहे हे वाचकाला ठरवायचे असते. आपण एखाद पुस्तक वाचून किंवा कोणा कडून तरी अपूर्ण ज्ञान घेऊन खरा इतिहास समजल्याचा गैरसमज करुन खोट्या बातमीकडे जास्त भर देता, म्हणून समाजात चुकीच्या प्रथा प्रचलित आहेत.  इतर कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचा अपमान करुण फालतूच्या बाता मारण्यापेक्षा विविध पुस्तके वाचून, एकच नाव असलेली अनेक पुस्तके चाळून, विविध व्यक्तीची मते जाणून, पूर्ण पणे माहिती समजून घेतल्या शिवाय खोटं कि खरं याची पडताळणी करून मगच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या (समाजाच्या) संस्कृतीच्या दैवताला दहन करुण त्यांचा अपमान करणे योग्य नव्हे.....  हि प्रथा पूर्वाजा पासून चालू असली तरी ती आता थांबायला पाहिजे.            तुम्ही रावण दहन करता तर का करता?... या मागचा नेमका हेतू तरी काय?... तुम्हाला यातून ने...

कन्याभ्रूण हत्या व आम्ही

Image
*"कन्याभ्रुण हत्या एक ज्वलंत समस्या"*       सामाजिक समस्या म्हणून समाजात रुजू असलेली स्त्रीभ्रूणहत्या हि महाराष्ट्र, देश भरच नव्हे तर जगात सुद्धा आहे. पण यांचे प्रमाण महाराष्ट्रात अधिकच दिसुन येत आहे. प्राचीन काळात देखील स्त्रीभ्रूणहत्या हि समस्या होतीच पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात यांचे प्रमाण गांभीर्याने जास्तीचे दिसून येत आहे.        आधुनिक काळात स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्या सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानावर आपला ठसा उमटवताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काबिज मिळवणारी स्त्री पाहावयास मिळते. आणि त्याच उच्च शिक्षित स्त्रीया एका स्त्रिला जन्म देण्यास नाक मुरडतात.      २०११ च्या जणगणनेनुसार देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात आढळून आला. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या ११,२३,७२,९७२ एवढी आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ५,८३,६१,३९७ एवढी व स्त्रियांची संख्या ५,४०,११,५७५ एवढी आहे. तर त्यापैकी लिंग गुणोत्तरांचे प्रमाण १००० पुराषा मागे ९४६ स्त्रीया जन्मास आल्या....

"स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेणारा - स्त्री "

Image
       प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यत देशात स्त्रियांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. भारत हा पुरुष प्रदान देश असल्यामुळे पुरुषांना समाजात प्रथम स्थान आहे व स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान मिळते. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारावर आधारित ईसाहित्य प्रतिष्ठान प्रकाशीत लेखक श्रीपाद राऊतवाड लिखित 'स्त्री' हे वैचारिक पुस्तक नुकतच वाचण्यात आलं.       एकिकडे स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते पंरतु स्त्री समाजात मात्र दुय्यम स्थानावरच आहे. खरतर स्त्री आणि पुरुष समानता असे फक्त नावापुरतेस मर्यादित राहिले आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व पेरतांना दिसतेय, स्त्रीया पुरुषांच्या तूलनेत कुठेही मागे दिसत नाही, स्वातंत्राच्या सत्तरी नंतर स्त्री समाजात सन्मानाने वावरतांना दिसतेय अस आपल्याला वाटत असले तरी आजही देश्यात स्त्रियांना भोगवस्तू समजणारी मानसिकता अजूनही जिवंत आहे,एकीकडे स्त्री अंतराळात पोहचते तर दूसरी बाजू स्त्रियांना चूल आणि मूल यातच डांबुन ठेवले जाते, ही निर्माण झालेली दरी आणि वाढत असलेली पुरुषप्रधान मान...

दंडार...

Image
....दंडार...           माझ्या गावात देवीच्या निम्मिताने गाववासियांच्या मनोरंजनासाठी दंडार ठेवण्यात आली होती. दंडार बघुन वाटल काही ना तर दंडार म्हणजे काय??? हेच माहित नाही,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ठेवताना प्राचीन काळात उपलब्ध असणारी साधने यांना नविन वाटतात.           दंडार हा शब्द काही लोकांनी अजुन ऐकला सुद्धा नाही. मि जेव्हा दंडारी बदल बोलले तेव्हा दंडार म्हणजे काय??? असा प्रश्न अनेकांनी मला विचारला, त्यांच्या डोक्यात दंडारी बद्दलचा प्रश्न चुळबुळत असेल, म्हणून हि थोडक्यात म ाहिती. दंडार हि प्राचीन काळापासून प्रचलित असणारी मनोरंजनाच साधन आहे. दंडारीच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन तसेच संदेश देण्याचा चांगला मार्ग आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दंडारीचा जास्त व मोठ्या प्रमानात उपयोग होत असे.           वृत्तपत्रे, दुरदर्शन, मोबाईल अशी साधने प्राचीन काळात उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे मनोरंजन, संदेश, एखादी बतमी दुसर्यापर्यन्त पोहचविने अवघड होते त्यामुळे स...

माणसातील माणुसकी...

Image
                                    समाजात उडणाऱ्या पाखरांचे पंख तोड़ताना अनेक लोक दिसतात पण त्याना आधार देऊन उडविन्याचा प्रयत्न फार कमी लोकांकडून होतो त्यावरून लक्षात येते ती माणसातील माणुसकी. एखादी पाखरू उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पंख न तोडता त्याला उडण्यास प्रोत्साहित करा, मदत करा. तुमच्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे एखादी पाखरू उडत असेल तर त्याची मदत करुण माणसातली माणुसकी दाखवा उलट त्याचे पंख तोडून राक्षस बणून जगासमोर येऊ नका. तुमच्यासारख्याच् या प्रोत्साहनामुळे हरलेला किंवा पंख तुटलेला पाखरू उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची तुम्ही मदत करा तुमच्या मदतीने तो उडून आपल भवितव्य उज्वल करत असेल तर त्यात काहिच गैर नाही.                  हरलेल्या मनाला आधार देऊन सावरायला लावणे हे तुमच्या सारख्या महान व्यक्ति कडून होत असेल तर फारच चांगल. ज्या मनाला तुम्ही आधार दिला होता ते मन तुमच्यामुळे प्रगति करताना व यशाचे उंच शिखर...