कन्याभ्रूण हत्या व आम्ही
- Get link
- X
- Other Apps
*"कन्याभ्रुण हत्या एक ज्वलंत समस्या"* सामाजिक समस्या म्हणून समाजात रुजू असलेली स्त्रीभ्रूणहत्या हि महाराष्ट्र, देश भरच नव्हे तर जगात सुद्धा आहे. पण यांचे प्रमाण महाराष्ट्रात अधिकच दिसुन येत आहे. प्राचीन काळात देखील स्त्रीभ्रूणहत्या हि समस्या होतीच पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात यांचे प्रमाण गांभीर्याने जास्तीचे दिसून येत आहे. आधुनिक काळात स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्या सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानावर आपला ठसा उमटवताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काबिज मिळवणारी स्त्री पाहावयास मिळते. आणि त्याच उच्च शिक्षित स्त्रीया एका स्त्रिला जन्म देण्यास नाक मुरडतात. २०११ च्या जणगणनेनुसार देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात आढळून आला. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या ११,२३,७२,९७२ एवढी आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ५,८३,६१,३९७ एवढी व स्त्रियांची संख्या ५,४०,११,५७५ एवढी आहे. तर त्यापैकी लिंग गुणोत्तरांचे प्रमाण १००० पुराषा मागे ९४६ स्त्रीया जन्मास आल्या. यापैकी शहरी भागातील एकूण लोकसंख्या ५,०८,२७,५३१ त्यापैकी पुरुषांची संख्या २,६७,६७,८१७ व स्त्रियांची संख्या २,४०,५९,७१४ आहे. यामध्ये लिंग गुणोत्तर पाहिले तर १००० पुरुषा मागे ८९९ स्त्रीया आहेत. तर ग्रामीण भागातील एकूण लोकसंख्या ६,१५,४५,४४१ यापैकी पुरुष संख्या ३,१५,९३,५८० तर स्त्रियांची संख्या २,९९,५१,८६१ एवढी आहे. ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर १००० पुरुषांमागे ९४८ स्त्रीया जन्मास आल्या आहेत. या जणगणनेवरुण असे लक्षात येते की, ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. खर तर मानवी गुणसूत्रानुसार मूली जन्माला येण्याची शक्यता अधिक असते तरी सुद्धा मुलींचे प्रमाण कमी आहे यांचे मुख्य कारण शोधणे गरजेचे आहे. स्त्रीभ्रूण हत्येचं वाढत प्रमाण यास कारण असलेले सामाजिक समस्या यावर चिंतन होणे गरजेचे आहे. शहरात सुशिक्षित लोक जास्त प्रमाणात वास्त्यव्यास आहेत म्हणून की काय तर शिकुन अडाण्यागत वागतात, आता असेही म्हणायला काही हरकत नाही. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात अशिक्षित लोक जास्त राहतात. खेड्यात राहण्याचे, खाण्या-पिण्याचे, कपड्या-लत्यांचे व शिक्षणाच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा तेथील लोकसंख्या फार कमी नाही. त्यातही मुलींना जन्मास घालतात म्हणजे शहरातील सुशिक्षिता पेक्षा खेडयातील अडाणी बरी असेच म्हणावे लागेल. फलित झालेले गर्भवतीच्या गर्भातील अंकुर स्त्री आहे हे कळताक्षणीच गर्भपात करण्याचा निर्णय घेतल्या जातो, तिला जगात येण्यापासून थांबवल जाते, तिचा जगण्याचा हक्क हिरावुन घेतला जातो. का तर ती एक स्त्रीभ्रूण आहे म्हणून. "कातोविण कातर" म्हणून स्त्रिला मान दिले जाते आणि तिच्याच गळयाला फास अडकविले जाते हा कुठला न्याय आहे. गर्भातच स्त्रीगर्भाचा जिव घेणे हे समाजातील लोकांना प्रतिष्ठेची बाब वाटते की सन्मान मिरवल्यागत होते हे त्यांनाच ठाऊक. यास सर्वस्वी जबाबदार म्हणजे एक स्त्रीच आहे. सासु, नंदन आणि महत्वाची स्त्री म्हणजे स्त्रीरोगतज्ञ. स्त्रीभ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात ०-६ वयोगटातील (१०००-९२२) मुलींच्या घटत्या प्रमानाची दखल घेवून पी.एन.डी.टी. हा कायदा १९९४ मध्ये मंजूर झाला व त्याची अंमलबजावणी २००१ पासून सुरु झाली. सुधारित तंरतूद नुसार (PCPNDT-pre conception and prenatal diagnostic) या कायद्याची अंमलबजावणी २००३ साला पासून झाली.या कायद्यानुसार लिंग परिक्षणावर बंदी घालण्यात आली असुन सुद्धा या कायद्याचे कोणीच पालन करताना दिसत नाही. याला जबाबदार म्हणजे डॉक्टर बरोबरच समाज देखील आहे. डॉक्टराणीच जर लिंग परीक्षणास नकार दिला तर लिंग माहित होणार नाही व सोनोग्राफी करत असेल तर नालायक निर्दयी वृत्ती न ठेवता लिंग सांगण्यास बंदी आहे असे रुग्णास व तिच्या नातेवाईकास समजावुन सांगीतले तर स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्नच येणार नाही व जे कोणी बळजबरीने लिंग परीक्षण करत असेल त्यांच्याकडून १०,००० रूपये दंड आकारने कायद्यन्वे अनिवार्य आहे हे पटवुन देणे गरजेचे समजले पाहिजे. तसेच समाजातील मुलींबद्दल असलेली कुविचाराचि मानसिकता बदलली तर ह्या समस्येला आळा बसेल आणि महिलांच्या संख्येत वाढ होईल.स्त्रीभ्रूणहत्या या गंभीर समस्येवर प्रशासना बरोबरच समाजानेही पुढाकार धरून, पुरुष प्रधान वृत्तीची मानसिकतेला आळा घालून स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे, नाहीतर काळानूरुप स्त्री-पुरुष समतोल बिघडेल... - करिश्मा गेडाम डोंगरगांव, जि.चंद्रपुर
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
thank you for comment.