रावण दहन योग्य की अयोग्य???
- Get link
- X
- Other Apps
एखाद्या कथेला कलाटनी देऊन त्याला वास्तविक व जीवंत वाटेल या पद्धतीने लिहिण्याचे काम लेखकाला चांगले जमते, प्रत्येक लेखक लेखणीतून आपले मत मांडण्याचा प्रयत्न करतो पण ते कितपत सत्य आहे हे वाचकाला ठरवायचे असते. आपण एखाद पुस्तक वाचून किंवा कोणा कडून तरी अपूर्ण ज्ञान घेऊन खरा इतिहास समजल्याचा गैरसमज करुन खोट्या बातमीकडे जास्त भर देता, म्हणून समाजात चुकीच्या प्रथा प्रचलित आहेत. इतर कोणत्याही समाजाच्या संस्कृतीचा अपमान करुण फालतूच्या बाता मारण्यापेक्षा विविध पुस्तके वाचून, एकच नाव असलेली अनेक पुस्तके चाळून, विविध व्यक्तीची मते जाणून, पूर्ण पणे माहिती समजून घेतल्या शिवाय खोटं कि खरं याची पडताळणी करून मगच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या (समाजाच्या) संस्कृतीच्या दैवताला दहन करुण त्यांचा अपमान करणे योग्य नव्हे..... हि प्रथा पूर्वाजा पासून चालू असली तरी ती आता थांबायला पाहिजे.
तुम्ही रावण दहन करता तर का करता?... या मागचा नेमका हेतू तरी काय?... तुम्हाला यातून नेमके काय साध्य करायचे आहे?... असे बरेचसे प्रश्न डोक्यात घोगावतात म्हणून रावण दहन या विषयावर......थोडेसे बोलू काही.
रावण सितेला अशोक वनात पळवून नेले. पण तीला स्पर्श केला नाही, तरी राम संशय घेऊन सितेच स्त्रीत्व तपासतो कारण रामाला स्वतच्या पत्नीवर म्हणजेच सितेवर विश्वास नसावा, अस म्हणायला हरकत नाही.
रावण स्त्रीच स्त्रीत्व जाणत होता म्हणून कदाचित त्याने तिला स्पर्श केला नसावा. असही असू शकते! पण तीचं अपहरण रावनाने केले अस म्हणणे चुकीचे नाही का?... चुकीचा समज ठेऊन रावणाला दहन करने हे चुकिचे नाही का?..
राजारावण हा महापराक्रमी योद्धा होता पण इतिहासापासून वंचित असल्यामुळे आजही आपल्याला खरा इतिहास कळला नाही. म्हणून आपण युवापिढी चुकीच्या प्रथाना बळी पडत आहोत आणि दरवर्षी रावण दहन करत आहोत. रावण दहन करण्या अगोदर जाणून घ्या खरा इतिहास काय म्हणतो, खोट्या वार्ता तर लाखो भेटतील तुम्हाला पण त्याची पारक करने तुम्हच्या हातात आहे.
रावण हा आदिवासी संस्कृतीतील दैवत आहे. आदिवासी समाजात त्याची पूजा अर्चा केली जाते, मग त्याचे दहन करुण आदिवासी संस्कृतीचा आपमान करणे नव्हे का???.. हा अधिकार कोणी दिला व का दिला?? दुसऱ्यांच्या संस्कृतीचा अपमान करण्या अगोदर विचार करा. पूर्वजांनी रावण दहनाची प्रथा सुरू केली म्हणून आपणही तेच केले पाहिजे असे जरुरी नाही.
छतीसगड़, मध्यप्रदेश, झारखंड, मेळघाट (अमरावती जिल्हा) या ठिकाणी रावणाला दहन न करता पूजा केली जाते, आजही श्रीलकेंत रावणाची मम्मी जपून ठेवल्या जाते, तमिळनाडू मध्ये मोठ मोठी मंदिरे बांधली जातात, मग महाराष्ट्रातच का रावण दहन करण्याची प्रथा राबवली जाते. तुम्हचे दैवत नाहीत म्हणून, तुमच्या संस्कृतीत बसत नाही म्हणून तुम्ही रावण दहन करता असच न.... तुम्ही दुसऱ्यांची संस्कृती जपु शकत नाही. तर त्याचा अपमान तरी का करता?? तुम्ही रावनाची पूजा केलीच पाहिजे अशी अपेक्षा नाही पण आदिवासी संस्कृतीचा अपमान करणे हि सुद्धा अपेक्षा नाही.
जशी तुम्हची संस्कृति तुम्ही जपता तसच आदिवासी समाजाला सुद्धा अधिकार आहे मग तुम्ही का रावण दहन करुण त्यांचा आपमान करता... तुमच्या संस्कृतीतील एखादी दैवता बद्दल वाईट साईट शब्द जरी मुखातून उदगारले तरी तुम्ही सर्व अकजुटिने खवलता. तसेच इतर समाजाचा त्यांच्या संस्कृतीचा आदर महत्वाचे नाही का???
(हे माझे वयक्तिक मत आहे)
करिश्मा गेडाम
2017
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment
thank you for comment.