दंडार...
माझ्या गावात देवीच्या निम्मिताने गाववासियांच्या मनोरंजनासाठी दंडार ठेवण्यात आली होती. दंडार बघुन वाटल काही ना तर दंडार म्हणजे काय??? हेच माहित नाही,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ठेवताना प्राचीन काळात उपलब्ध असणारी साधने यांना नविन वाटतात.
दंडार हा शब्द काही लोकांनी अजुन ऐकला सुद्धा नाही. मि जेव्हा दंडारी बदल बोलले तेव्हा दंडार म्हणजे काय??? असा प्रश्न अनेकांनी मला विचारला, त्यांच्या डोक्यात दंडारी बद्दलचा प्रश्न चुळबुळत असेल, म्हणून हि थोडक्यात माहिती.
दंडार हि प्राचीन काळापासून प्रचलित असणारी मनोरंजनाच साधन आहे. दंडारीच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन तसेच संदेश देण्याचा चांगला मार्ग आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दंडारीचा जास्त व मोठ्या प्रमानात उपयोग होत असे.
वृत्तपत्रे, दुरदर्शन, मोबाईल अशी साधने प्राचीन काळात उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे मनोरंजन, संदेश, एखादी बतमी दुसर्यापर्यन्त पोहचविने अवघड होते त्यामुळे समाजातील लोक एकत्रित येऊन दंडार करीत असत. दंडारीमध्ये सर्व पुरुष मंडळीच असतात. त्यामध्ये पुरुष हाच घटक स्त्रियांच सोंग (पात्र) घेऊन लोकांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची कला मंचावर उतरवतात. दंडार हि प्राचीन काळापासून नावाजलेल साधन आहे दंडारीच्या माध्यमातून चांगला संदेश जणसमुदाया पर्यन्त पोहचविन्याचे काम केले जाते तसेच समाजात असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र बांधून ठेवले जाते.
पूर्वी दंडार म्हटल तर दूर दुरुण लोक एकत्र जमा व्हायची. एकंदरित दंडारीला जास्तच वाव होता. (जसे आधुनिक युगात मोबाईल ला वाव देतात.) एखाद्या विषयाची निवड करुण त्याचे सविस्तर त्यांच्या पात्रातून दाखवत असत. दंडार ही वास्तविकता दाखवण्याचा प्रयन्त करतात. विविध गाण्याचा संच करुण गाण्याच्या स्वरुपात संपूर्ण माहिती दंडारीमध्ये दाखवतात. दंडारीमुळे पूर्वी जनतेत संघटना, एकजुटपना, सातत्य, आपुल्की निर्माण करीत असे तसेच समाजात आनंददायी वातावरण निर्माण करण्यास मदत होत असे.
हाच प्रकार आज शोधून सापडणार नाही यातला झाला आहे. म्हणजे आता खुप कमी प्रमाणात आढळून येते. आधुनिकते नुसार नवनवीन तंत्रज्ञानामुळे प्राचीन कालीन साधनाचा उपयोग दंगावताना दिसते.
करिश्मा गेडाम.
Comments
Post a Comment
thank you for comment.