"स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेणारा - स्त्री "

       प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यत देशात स्त्रियांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. भारत हा पुरुष प्रदान देश असल्यामुळे पुरुषांना समाजात प्रथम स्थान आहे व स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान मिळते. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारावर आधारित ईसाहित्य प्रतिष्ठान प्रकाशीत लेखक श्रीपाद राऊतवाड लिखित 'स्त्री' हे वैचारिक पुस्तक नुकतच वाचण्यात आलं.
      एकिकडे स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते पंरतु स्त्री समाजात मात्र दुय्यम स्थानावरच आहे. खरतर स्त्री आणि पुरुष समानता असे फक्त नावापुरतेस मर्यादित राहिले आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व पेरतांना दिसतेय, स्त्रीया पुरुषांच्या तूलनेत कुठेही मागे दिसत नाही, स्वातंत्राच्या सत्तरी नंतर स्त्री समाजात सन्मानाने वावरतांना दिसतेय अस आपल्याला वाटत असले तरी आजही देश्यात स्त्रियांना भोगवस्तू समजणारी मानसिकता अजूनही जिवंत आहे,एकीकडे स्त्री अंतराळात पोहचते तर दूसरी बाजू स्त्रियांना चूल आणि मूल यातच डांबुन ठेवले जाते, ही निर्माण झालेली दरी आणि वाढत असलेली पुरुषप्रधान मानसिकता यावर स्त्री या पुस्तकातून लेखकाने प्रत्येक विषयाला स्पर्श करून आपले विचार मांडले आहेत.
             
         सध्या चालू असलेली महाराष्ट्रातील मोठी समस्या म्हणजे हुंडा पद्धती. हुंडा पद्धती हि भारतात कमी पण महाराष्ट्रात जास्त प्रमाणावर आढळून येते.  या हुंडा पद्धतिमुळे अनेक गरीब शेतकरी वडील कर्जामुळे आत्महत्या करत आहेत व काहि शेतकऱ्यांच्या तरुण मूली वडिलांवर कर्ज होऊ नये म्हणून स्वतः आपले जीव दावनिला लावत आहेत. याचे ताजे उदाहरण राउतवाड यांनी स्त्री पुस्तकात दिले आहे.
        देश्यात प्रत्येकी २० मिनिटाला स्त्रियांवर अत्याचार होतोय, सावित्रीच्या लेकी म्हणून जेव्हा आम्ही समोर येतोय तेव्हा आमच्या समस्या जगासमोर मांडतांना प्रत्येक स्थरावरून प्रतिसाद येतोच, एकाद्या ठिकाणी स्त्रियांवर अन्याय झाला तर रस्त्यांवर उतरून मेणबत्ती पाजळतो, मात्र याने काही मानसिकतेत बदल होतांना दिसत नाही, रस्त्यावरून वावरताना, महाविद्यालयात जातांना, एकटी प्रवास करताना असे अनेक समस्या स्त्रियांना सहन करावे लागत आहे.. स्त्री एकटी दुकटी बाहेर दिसली की लोकांच्या नजरा भारावुन जातात. मग चालू होते त्याचं अश्लील भाषेत टिप्पणी करन.
          सकाळी हाती वृत्तपत्र घेतल तर एकतरी बलात्कार, स्त्री अत्याचाराची बातमी असतेच, दिवसातून किती तरी घटना नित्यनेमाने घडत असतात. कधी तीन वर्षाच्या चिमुकलिवर तर कधी सत्तर वर्षाच्या वृद्धेवर. वृत्तपत्र, दूरदर्शन व सोसिअल मिडिया यांच्या माध्यमातून अशा बातम्या पहावयास मिळते. बलात्कार करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, त्यांचा निषेध झालाच पाहिजेे असे सोसिअल मिडियावर बोंबा मारताना आजचे तरुण वर्ग दिसत आहेत. पण कधी, कुठे, कोणी याची अमलबजावणी करताना दिसत नाही म्हणून स्त्रीयांवरील अत्याचार हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. लेखक श्री श्रीपाद राऊतवाड यांनी स्त्रियांबद्दलच्या समस्याचा सखोल अभ्यास व बारीक सारिक मुद्दे लक्षात घेऊन स्त्रियांच्या समस्या मांडल्या हे आजच्या वातावरणात या मानसिकतेची गरज भासत आहे.. मला वाटत स्त्रियांबद्दल अनेक लेखकांनी कांदबर्या, नाटक, लघुकथा अशी अनेक पुस्तके लिहीले आहेत पण वयाच्या २२व्या वर्षी लेखक श्रीपाद राऊतवाड यांनी स्त्री समस्येवर फुंकर घालण्या सखोल अभ्यासात्मक दूरदृष्टीने लिखाण केले म्हणजे हे आमच्यासाठी कौतुकास्पद बाब आहे.
              स्त्रीयांच्या समस्येबद्दल मला नेहमीच प्रश्न पडायचा, माझ्या सारख्या अनेकांनाही पडत असेलच. माझे प्रश्न मला आजवर जगासमोर मांडता आले नाही ते प्रश्न लेखकाने त्यांच्या विचारातून लेखनीद्वारे 'स्त्री' या पुस्तकाच्या स्वरुपात स्पष्टपणे जगासमोर आणले आहे. समाजात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक घटकांना स्पर्शून जाणारे स्त्रियांच्या समस्येचा जाणिवेंचा आविष्कार असलेला लेखक श्रीपाद राऊतवाड लिखित स्त्री हे वैचारिक पुस्तक एकदा आपल्या नजरेखालून नक्की घाला, नक्की वाचा व इतरांना सुद्धा वाचण्यास प्रोत्साहन करा. हे पुस्तक आपणास विकत घेण्याची गरज नाही ते तुम्हच्यासाठी ईसाहित्य प्रतिष्ठाणने विनामूल्य वाचनाची सोय केलेली आहे.

समीक्षक :- करिश्मा गेडाम
पुस्तक :- स्त्री (वैचारिक पुस्तक)
लेखक :- श्रीपाद राऊतवाड
प्रकाशक :- ईसाहित्य प्रतिष्ठान
किंमत :- विनामूल्य ,पाने ७१

Comments

Popular posts from this blog

माणसातील माणुसकी...

दंडार...