कन्याभ्रूण हत्या व आम्ही

*"कन्याभ्रुण हत्या एक ज्वलंत समस्या"* सामाजिक समस्या म्हणून समाजात रुजू असलेली स्त्रीभ्रूणहत्या हि महाराष्ट्र, देश भरच नव्हे तर जगात सुद्धा आहे. पण यांचे प्रमाण महाराष्ट्रात अधिकच दिसुन येत आहे. प्राचीन काळात देखील स्त्रीभ्रूणहत्या हि समस्या होतीच पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात यांचे प्रमाण गांभीर्याने जास्तीचे दिसून येत आहे. आधुनिक काळात स्त्रीया कोणत्याही क्षेत्रात मागे नाही त्या सर्वच क्षेत्रात अव्वल स्थानावर आपला ठसा उमटवताना दिसतात. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काबिज मिळवणारी स्त्री पाहावयास मिळते. आणि त्याच उच्च शिक्षित स्त्रीया एका स्त्रिला जन्म देण्यास नाक मुरडतात. २०११ च्या जणगणनेनुसार देशात लोकसंख्या कमी होण्याचा दर सर्वात जास्त महाराष्ट्रात आढळून आला. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या ११,२३,७२,९७२ एवढी आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या ५,८३,६१,३९७ एवढी व स्त्रियांची संख्या ५,४०,११,५७५ एवढी आहे. तर त्यापैकी लिंग गुणोत्तरांचे प्रमाण १००० पुराषा मागे ९४६ स्त्रीया जन्मास आल्या....