"स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेणारा - स्त्री "

प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यत देशात स्त्रियांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत आहेत. भारत हा पुरुष प्रदान देश असल्यामुळे पुरुषांना समाजात प्रथम स्थान आहे व स्त्रियांना दुय्यम दर्जाचे स्थान मिळते. स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारावर आधारित ईसाहित्य प्रतिष्ठान प्रकाशीत लेखक श्रीपाद राऊतवाड लिखित 'स्त्री' हे वैचारिक पुस्तक नुकतच वाचण्यात आलं. एकिकडे स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसते पंरतु स्त्री समाजात मात्र दुय्यम स्थानावरच आहे. खरतर स्त्री आणि पुरुष समानता असे फक्त नावापुरतेस मर्यादित राहिले आहे. स्त्री प्रत्येक क्षेत्रात आपलं अस्तित्व पेरतांना दिसतेय, स्त्रीया पुरुषांच्या तूलनेत कुठेही मागे दिसत नाही, स्वातंत्राच्या सत्तरी नंतर स्त्री समाजात सन्मानाने वावरतांना दिसतेय अस आपल्याला वाटत असले तरी आजही देश्यात स्त्रियांना भोगवस्तू समजणारी मानसिकता अजूनही जिवंत आहे,एकीकडे स्त्री अंतराळात पोहचते तर दूसरी बाजू स्त्रियांना चूल आणि मूल यातच डांबुन ठेवले जाते, ही निर्माण झालेली दरी आणि वाढत असलेली पुरुषप्रधान मान...