दंडार...

....दंडार... माझ्या गावात देवीच्या निम्मिताने गाववासियांच्या मनोरंजनासाठी दंडार ठेवण्यात आली होती. दंडार बघुन वाटल काही ना तर दंडार म्हणजे काय??? हेच माहित नाही,आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती ठेवताना प्राचीन काळात उपलब्ध असणारी साधने यांना नविन वाटतात. दंडार हा शब्द काही लोकांनी अजुन ऐकला सुद्धा नाही. मि जेव्हा दंडारी बदल बोलले तेव्हा दंडार म्हणजे काय??? असा प्रश्न अनेकांनी मला विचारला, त्यांच्या डोक्यात दंडारी बद्दलचा प्रश्न चुळबुळत असेल, म्हणून हि थोडक्यात म ाहिती. दंडार हि प्राचीन काळापासून प्रचलित असणारी मनोरंजनाच साधन आहे. दंडारीच्या माध्यमातून मनोरंजन, प्रबोधन तसेच संदेश देण्याचा चांगला मार्ग आहे. पूर्वी मनोरंजनाची साधने कमी प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे दंडारीचा जास्त व मोठ्या प्रमानात उपयोग होत असे. वृत्तपत्रे, दुरदर्शन, मोबाईल अशी साधने प्राचीन काळात उपलब्ध नसल्यामुळे लोकांचे मनोरंजन, संदेश, एखादी बतमी दुसर्यापर्यन्त पोहचविने अवघड होते त्यामुळे स...