माणसातील माणुसकी...

समाजात उडणाऱ्या पाखरांचे पंख तोड़ताना अनेक लोक दिसतात पण त्याना आधार देऊन उडविन्याचा प्रयत्न फार कमी लोकांकडून होतो त्यावरून लक्षात येते ती माणसातील माणुसकी. एखादी पाखरू उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे पंख न तोडता त्याला उडण्यास प्रोत्साहित करा, मदत करा. तुमच्या मदतीमुळे आणि प्रोत्साहनामुळे एखादी पाखरू उडत असेल तर त्याची मदत करुण माणसातली माणुसकी दाखवा उलट त्याचे पंख तोडून राक्षस बणून जगासमोर येऊ नका. तुमच्यासारख्याच् या प्रोत्साहनामुळे हरलेला किंवा पंख तुटलेला पाखरू उंच भरारी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची तुम्ही मदत करा तुमच्या मदतीने तो उडून आपल भवितव्य उज्वल करत असेल तर त्यात काहिच गैर नाही. हरलेल्या मनाला आधार देऊन सावरायला लावणे हे तुमच्या सारख्या महान व्यक्ति कडून होत असेल तर फारच चांगल. ज्या मनाला तुम्ही आधार दिला होता ते मन तुमच्यामुळे प्रगति करताना व यशाचे उंच शिखर...